ऑनलाइन शिक्षण
ऑनलाइन शिक्षण


शिक्षणाचा झालाय राडा
सानूल्याला कसा शिकवायचा अंकलिपीचा पाढा
एकाची सकाळची तर दुसर्याची दुपारची शाळेची वेळ
पालकांना खेळावा लागतो आहे कसरतीचा खेळ
एक चौथीत, एक पहीलीत, एक खेळत आहे छोटी
सगळ्यांना कंप्युटर, टॅब कसे आणायचे ही चिंता मोठी
नाही शाळेची घंटा, नाही दप्तराचे बोजे
शिक्षण न घेताच फीचे वाढत चालले ओझे
चाकरमान्याने कसे जगायचे, भागवायचा सारा खर्च कसा
पुढच्या पिढीला मिळेल वाटतं भिकार्याचा वसा
ढकलायचे कसा हा कुटुंबाचा गाडा
शिक्षणाचा खरंच वाढत चाललाय राडा ॥