ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण
आली कोरोना लहर
पीडित ग्रामीण शहर
खूप दहशतवादी कहर
अशी प्रथमतःच लहर..1
भयानक संकट आले
लॉकडाऊन झाले घोषित
सर्व कार्यालये सामसूम
शाळा सुद्धा बदं झालेत...2
अभ्यासात्मक पाऊल
शिक्षण विभागा मार्फत
ऑनलाईन शिक्षणपर्व
शिरले जोमाने घरात...3
आता मोबाईल स्क्रीनवर
अध्ययन होण्याची आशा
अँड्रॉइल सर्वांकडे कुठं?
पदरी पडली खूप निराशा...4
कार्य क्षेत्री उद्भवल्या
बहू तांत्रिक अडचणी
रिचार्ज, नेट नसायचा
मग शिक्षण अन्य मार्गांनी..5
ऑफलाईन शिक्षण मस्त
शाळेतील मजाच न्यारी
दहाची घंटा वाजण्यापूर्वी
विद्यार्थ्यांची होई तयारी..6
वर्गातील रंजक अभ्यास
आकलन होई खास
गुरुजींच्या सानिध्याची
लागली ओढ मनास..7
शाळेतील परिसरात
खेळतात मुले सगळी
मध्यांनी पोषण आहार
मजाच काही वेगळी..8
