ओळख...
ओळख...
हरवल्या त्या पापण्यां शोधते ,ज्यात स्वप्न माझे होते ,
आज भेटता डोळ्यांस डोळे , अनोळखी स्वप्न माझे होते ...
स्वतःची ओळख सांगावी कशी, ओळखीच्या माणसाला,
डालवून गेला सुंगध मोगरा , सुंगधी क्षण गंधाळले माझे होते...
शब्दं माझे समजण्या पलीकडले , त्याला ना समजले,
समजून उमजून केले प्रेम मी , अश्रू वाहवत डोळे माझे होते...
काव्यात ओवते मी आता , शब्द जो अलवार ओठांत ,
ओठंच शिवले त्याने , मुके शब्द अवंढा गिळत माझे होते...
लिहीताने जरा कचरते मीच, अंतरंगात उठले काहूर,
न्याय मिळेल का? स्पंदनांना माझ्या, हृदयात ज्या माझे होते...
कळत नाही त्यांना मी लिहून ठेवले, जे कागदांवर कधीचे ,
तु समजावून सांगना , हे शब्दंच आता जीवन माझे होते...
