ओलावले मन
ओलावले मन
1 min
351
झाली संध्याकाळ
ओलावले मन
निळ्या आकाशात
भिनले श्वास
परतल्या पावलांना
साद थांबल्या स्वप्नांची
उभ्या वळणावर
आतुरलेले नेत्र
ओझरती भेट
ओसरले शब्द
सैरभैर आकाशात
विखुरल्या भावना
का याव्यात
पुन्हा पुन्हा संध्याकाळी
उधाण यावे या सागराला
झाली संध्याकाळ
ओलावले मन
