STORYMIRROR

Raghu Deshpande

Others

3  

Raghu Deshpande

Others

ओढताण

ओढताण

1 min
185

वीतभर जागेसाठी

उभें शरीर जोपलें

ऊन थंडी वारा पाणी

जसें नशीब कोपलें....

हातावरीं पोट ज्याचे

हाती नाही भाग्यरेषा

दोन आणें चार आणें

फिरवीसीं दाहीदिशा...

पाठ पोट एक झालें

धडपड जगण्याचीं

चिंता ओसरीं टांगली

मुल मुली जोपण्याची...

दोष नाही कुणा देत

पूर्व कर्म फळा आलें

दोन घास पोटभर

हात उशाला लागलें...

झालें इमलें आकाशी

माझ्या घामाच्या धारांनी

काल भोकाड सांधले

जुन्या तुटक्या कौलांनी...

मान वेलाळून पाही

झाली असे तिन्हीसांज

भिरभिर सैरभैर

वाट पाहीं युवराज....

गडी अंगाला बिलगे

धुंडे काय पिशवीत

स्वर्ग उरें दोन बोटं

हाती लागे बिसकुट...

वाव भर तेल आणा

करी आशा मालकिण

अशी घालतें फोडणी

बाई माझीं सुगरण...

सा-या दिसाची कमाई

हाता तोंडाची जोडणी

कधीं मधी शिळपातं

अन्न परब्रम्ह जाणीं...


Rate this content
Log in