STORYMIRROR

Janardan Gore

Others

4  

Janardan Gore

Others

ओढ श्रावणाची

ओढ श्रावणाची

1 min
234

ओढ श्रावणाची लागली जीवाला 

आतुर डोळे निसर्ग सृष्टी पाहायला

सर सर पडणाऱ्या पावसाच्या सरी

वृक्ष वेलींनी सजलेली खोल दरी //१//


झुळू झुळु वाहणारे रमणीय झरे

सुखावते मन पाहून रूप साजरे

किलबिलाट एकाहून एक सरस

जणू चालते पक्ष्यांमध्ये चुरस //२//


ओढ श्रावणाची फारच सुरेख

चमकते वीज, गर्जतो मेघ

गाई वासरे, रानात चरती

आनंदाने खाती गवताची पाती //३//


रानवाटा साऱ्या भिजती चिंब

पडता पावसाचे टपोरे थेंब

ओसाड रान दिसते खास

साऱ्यांनाच लागते श्रावणाची आस //४//


ओढ श्रावणाची एक पर्वणी

करते शृंगार सारी धरणी

नजारा दिसतो खूपच छान

टप, टप वाजते पान गात गाणं //५//


Rate this content
Log in