ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

5
बरसता पर्जन्यधारा
झाली तृप्त ही धरा
रिमझिम पाऊस हा
वाटतो सर्वांना बरा
ओलावली धरणी
कुशीतच न्हाली
टप्पोऱ्या थेंबांनी
मृदा ओली झाली
सर सर झरती सरी
दोरीसम नभामधूनी
पाखरांची किलबिल
रांगोळीच्या थेंबामधूनी
घन काळे गरजती
झंकार नादरवाचा
घूमतोय रानवारा
शिडकावा दवाचा
घरंगळतो पाऊसही
ढिसाळ मातीत
काळ्या मेघांतून
तृणांच्या पातीत