ओढ हि मनाची
ओढ हि मनाची
आतुरता लागलीय पुन्हा आत्मस्वकीयांना भेटण्याची
त्याकरिता ती आपली स्वप्ननगरी गाठण्याची....
जरी उपभोगल सहलीत रमणीय असे सुख...
पण माझी छप्पनभोगानी नाहि तर
चटणीभाकरीने शमणारी आहे भुक...
तिथल्या मातीत तो कस्तुरीचा गंध नव्हता...
कविता लिहून सोडून मज कोणता दुसरा छंद नव्हता..
जरी मी गेलो पर्वतांच्या उंच शिखरांवर
पण तुम्हिच आहात औषध माझ्या सर्व विकारांवर...
रस्त्यावरील दगडधोंडे एकच होते बोलत...
जेव्हा मी अंर्त:मनाचे एक एक व्दार होतो खोलत.
" आकाशात सुर्यासोबत चंद्र सुध्दा असतो
आता इकडे तिकडे मला फक्तच मृगजळच भासतो "
