न्याय..!
न्याय..!
1 min
155
लढत अडखळत का होईना
आज न्याय मिळाला
जखमेने माखलेल्या शरीराचा
आज घाव जरा बरा झाला
रोज रोज तिचा आत्मसन्मान
पणाला लागत होता
काय निर्णय घेतला जाईल म्हणून
जीव तळमळत होता
इतक्या वर्षाचा संघर्ष
त्या मायने डोळ्याने पाहिला
न डगमगता पुढे होऊन
सारा भारत पाठीशी उभा केला
अनंतात विलीन झालेले
नाही कधी परत फिरले
न्यायदेवता झोपली नाही
आज मात्र सिद्ध झाले..
