नव्या युगाची कायनी
नव्या युगाची कायनी
1 min
127
(वर्हाडी भाषा)
काय सांगू बापा तुमाले नव्या युगाची कायनी
पायता पायता दिस गेले लेकरं झाली शायनी
आध्यात्म रायलं माग कायजाची झाली चायनी
बेलबाटमवर होते नव्या संसाराची पायनी
मोबाईल गाडीले दम नाई शोक झाले भारी
चाबी लावली गाडीले की सतरा चकरा मारी
टाईम नाई लेकराईले हाटेलात वारी
कायजी करुन पुरे थकलो देवच त्यायले तारी
वाट पायतात माय बाप कायजाच होते पानी पानी
घरी येतात रामपायरी जरा धाक नाई मनी
युग चाललं पुळे पुळे येत नाई ध्यानी
तामझाम पायजे त्यायले ताल इंग्रजा वानी
