नववर्ष २०२०चे स्वागत
नववर्ष २०२०चे स्वागत
डिसेंबर संपतो कधी
केव्हां येतो जानेवारी
दरवर्षी नव्या वर्षाची मज असते न्यारी
मित्रमैत्रिणी, परिवार, नातेवाइक मोठा केक कापायचा, प्यायची थोडी वाईन
नॉनव्हेज वर मारायचा ताव
जोडायचे नवे मित्र
खाऊन जायचा भाव
टाळ्या चुटक्या मारायची शिट्टी
जोश सांभाळुन पेटवायची शेकोटी
गाणे गात, फेर धरत
नाचायचे बागडायचे
नव्या वर्षाचे स्वागत
नव्या संकल्पनेने सजवायचे
उत्साहाने टवटवीत मनाने
साजरे करा वर्षानुवर्ष
दरवर्षी नव्याने होत असतो हर्ष
हर्षाची सगळ्यांना चढते नशा
बघायला मिळू दे उजळलेल्या दाही दिशा ॥
