नववधू
नववधू
1 min
391
सप्तपदी घेऊन
मंगळसूत्रात बांधून
सात वचन देऊन
माप ओलांडून
आली तुझ्या दारी
नेसून माहेरची साडी
सोबत संस्कारांची शिदोरी
पदार्पण केले तुझ्या घरी
नववधू प्रिया मी लाजली
प्रेमाने तुझ्या बहरली
संसारात तुझ्या रमली
प्रेमाने घरटी बांधली
सुख पडलं माझ्या पदरी
जीवनाला आली बहार
फुलला माझा संसार
जीवनाला मिळाला आधार
