नवथर वसुंधरा
नवथर वसुंधरा
1 min
440
नटलीय वसुंधरा ही
शालू नेसून नवतीचा
गालिचाच पसरलाय
हिरव्या तृणपातीचा
गारठली गुरे माणसे
बसली ऊबीला घरात
सांडलेत दवबिंदूही
चमकती सोनकरात
पांघरले धुक्याचे अभ्र
मेघांनीच आसमंतात
उतरुनि भूवरी हे धुके
सौंदर्याचा उल्कापात
निसर्ग नटला हिरवाईने
कौलारू घरे खेड्यातली
विहंगम रमणीय हे दृश्य
नष्ट संस्कृती वाड्यातली
