STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

.नवरंगी पाऊस

.नवरंगी पाऊस

1 min
27.1K



चांदी सारखा पांढरा पाऊस

सरसर करुनी धावत येई,

चींब चींब भिजवूनी म्हने

वर्का सारखा चमचमनारा

ऋतू हिरवा ऋतू बरवा करून जा..

सोण्या सारखा पिवळा पाऊस

वरवर मजला कवेत घेई,

असली नकली ची पारख कर

हळु हळु जपुन चलावे सई,

माझ्या सारखी वितळुन जा.

ऋतू हिरवा ऋतू बरवा करून जा..

हि-या सारखा चमचम पाऊस

तरतर करुनी जवळ येई

थोडे थोडे खेटुन म्हने

माझ्या सारखी झिजून ताई

अष्टपैलू हिरे घडवून जा..

ऋतू हिरवा ऋतू बरवा करून जा.

मोत्या सारखा मोतिया पाऊस

धरपड करुन पडत जाई

स्वच्छ स्वच्छ सतेज कांती

गार-गार तनमन गाने गाई,

शितल चंदन होवून जा.

ऋतू हिरवा ऋतू बरवा करून जा.

नीलम सारखा निळा पाऊस

दम-दम करुन क्षणात येई

शांतीभ्रांतीचा मंत्र देउन म्हणे

नीळ्या-नभात आभाळ होवून

आसमंतात तु विखरून जा.

ऋतू हिरवा ऋतू बरवा करून जा.

कधी बेमौसम बरसे पाऊस

आडवा-तिडवा घुमसत येई,

ताज्या जखमांना कुरवाळून म्हणे

बरस-बरस तु डोळस बाई अन्

आपले दुख विसरुन जा.

ऋतू हिरवा ऋतू बरवा करून जा.


Rate this content
Log in