STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

नवरात्रोत्सव

नवरात्रोत्सव

1 min
231

अश्विन शुद्ध प्रतिपदेला घट स्थापिला

दुर्गा आवाहन करून बोलाविले तिला ।।१।।


शक्तीरूप धारिणी महिषासुर मर्दिनी

सांभाळते भक्तांना अनंत रूपे घेउनी ।।२।।


माय बहीण पत्नी मुलगी सखी नि प्रिया

आदिशक्ती दुर्गा चंडिका तीच आदिमाया ।।३।।


देवीच्या आगमनाने चैतन्य पसरले

लहानमोठे रास गरबा खेळू लागले ।।४।।


केंद्रात देवी करू मनोभावे तिची भक्ती

उपासना करू जीवनात मिळवू शक्ती ।।५।।


Rate this content
Log in