STORYMIRROR

Priya Bhambure

Others

3  

Priya Bhambure

Others

नवरात्र विशेष

नवरात्र विशेष

1 min
254

हे तुळजापूरवासिनी तुळजाभवानी माता

वंदन करूनी तुझे स्तवन करते आता


ठाव हिचे आहे डोंगराच्या उतरणीवर

भक्तांच्या संकटी धावून येई सत्वर 


भक्तांच्या हाकेला धावणारी ही देवी

त्वरीत मनोरथ पूर्ण करणारी ही रामवरदायिनी


माता चांदीच्या सिंहासनावर विराजमान हिची मूर्ती 

जागृत शक्तिपीठ म्हणून जगभर आहे किर्ती 


श्री देवीची मूर्ती आहे गडकी शीलेची

अष्टभुजात शोभतात नाना शस्त्रे देवीची  


दक्षिण काशी आहे श्री क्षेत्र तुळजापूर

ऋषीपत्नीच्या रक्षणासाठी मारला दैत्य क्रूर


अगदी थाटात निघतो छबीना देवीचा 

नाना वस्तू, नैवेद्यासह देवांना भेटण्याचा 


गळ्यात शोभे मंगळसूत्र, चंद्रहार, पोवळ्याच्या माळा

पावलात नटले जोडवी, पायबंद, व मासोळ्या


तुळजापूरजवळ आहे अनेक तीर्थक्षेत्र 

नागझरी, गोमुख, कल्लोळ, आहे तीर्थ


भारतीवुवांच्या मठात देवी सारीपाट खेळण्यास जाते

चिंतामणी क्षेत्री आपली चिंता हरते.


Rate this content
Log in