नवरात्र घटस्थापना
नवरात्र घटस्थापना
नारत्रोत्सव आज देवीने
साज शृंगार बहू केला l
नऊ दिवसाची घटस्थापना
मनी हर्ष किती झाला l १
देवी आणण्याची तयारी केली
वाजत गाजत घरोदारी बसली।
रोज आरती पूजनाची तयारी
सगळेजण आनंदाने नाचली। २
पातळ नेसली, साज शृंगार केला
ढोल ताश्याच्या गजर, सुगंध धुपाचा।
देवी मातेला आरतीला दिवा
दिला भक्ताने गावरान तुपाचा। ३
सगळ्याजणी नटून थटून
दांडिया खेळे उत्साहाने।
गाणे वाजती तालावर
कशी तालात टीपरिवर टीपरी पडे। ४
येई उत्साहाला उधाण
आहे जरी नऊ दिवसाचे उपवास।
तहान भूक हरपून जाई
जगदंबे तुझ्या सहवासात । ५
नवरात्राचे नऊ रंग
जीवनात उत्साह भरती
मनोभावे कुलस्वामिनीचे
भजन, पूजन, आरती करीती l६
दहा दिवस कसे गेले
तुझ्या ग सेवेत आई जगदंबे।
उठल्यापासून पळापळ भक्तांची
नऊ रंग तुझे नऊ रूपे। ७
ठेव सुखी सगळ्यांना
आता एकच मागणे।
इच्छा कर पूर्ण सर्वांच्या
श्री आदिमाया जगदंबे । ८
