नवरा बायको प्रेम स्पेशल संसारी
नवरा बायको प्रेम स्पेशल संसारी
1 min
462
नवरा बायको यांचे प्रेम ,
ते घेतले प्रेमाचे घट्ट दूध l
साखरेची गोडी जशी त्यांच्या,
सुखी संसाराची ,घेतली साखर l
संसारातले रुसवे फुगवे ते भांडण,
अशी घेतली चहाची पावडर l
संसाराला अशी ही वेगळीच मस्त चव ,
असं चवीला घेतलं थोडं आलं, वेलची पावडर l
असा हा संसारी गरम गरम,
वाफाळलेला चहा प्या,
आपल्या सुखी संसाराची गोडी,
त्यात उतरली आहे का चाखा l
