नविन वर्ष
नविन वर्ष
1 min
215
बघता बघता वर्ष सरले,
कडू गोड आठवणींनी होते जे भरलेले,
या वर्षाने खुप काही शिकवले,
आयुष्य किती क्षणभंगुर आहे,
जणू प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करवले,
कधी झाला खुप हर्ष,
कधी वाटले जीवन व्यर्थ,
कधी आले ओठांवर नकळत हसू,
कधी दाटले डोळयात आसू,
खोटया नात्याची झाली जाणीव,
स्वार्थी लोकांची इथे ना उणीव,
अवचित अशा वळणावरती,
ऋणानुबंधाच्या भेटी ही घडती,
झाले गेले द्यावे सोडून,
सरते वर्ष गेले शिकवून,
नव्या संकल्पाची नव्या स्वप्नांची,
घेऊ गगनभरारी इतकीच आस नव्या वर्षाची!
