नवीन वर्षा
नवीन वर्षा
सरते वर्ष गेले सरून
नवीन वर्षाच्या नवीन आशा
येतांना तू घेऊन ये रे
नवीन वर्षाच्या नवीन दिशा।
एक तारखेच्या शुभदिनी
भिंतीवर होशील विराजमान।
आनंद ,सुख,समाधान आणि
निरोगी आरोग्याचे दे आम्हा पसायदान।
आता दुःख हा शब्द तू यावर्षी आमच्या आयुष्यातून खोडुन टाक।
उत्तम आरोग्य मिळो सगळ्यांना
असा Password आम्हा देऊन टाक।
भोगले जे दुःख आम्ही, तणावग्रस्त राहिलो।
नव्या उमेदीने पुन्हा नव्या आशेने यावर्षी उभे राहिलो।
झाली सगळी दूर नाती पुन्हा तू एकत्र आनशील ना?।
हे नववर्षा यावर्षी तू सगळ्यांना सुखी ठेवण्याचा संकल्प तू घेऊन येशील का?।
चुकले असेल आमचे जरी काही
अपराध आमचे असतील कोटी।
हसतमुखाने मोरेश्वरा तू ते या वर्षी घालशील ना रे पोटी
