नवीन वर्ष ...
नवीन वर्ष ...
आयुष्य घडाळ्याच्या काट्या प्रमाणे धावते ....
दरवर्षी प्रमाणे नवीन वर्ष दाखल होते ....
बारा महिन्याचे कॅलेन्डर भितींवर झळकते ....
नवीन वर्षात संकल्प करण्याचा हल्ली सुरु झालाय ट्रेंड ...
थोड्याचा तो पूर्ण होतो काहींचा थोड्या दिवसातच बंद होतो ....
पण या वर्षी मी ठरवले कि करीन मी पण एक संकल्प .....
धावत्या आयुष्यात सगळ्यासाठी वेळ काढताना काडीन थोडा वेळ माझ्यासाठी पण ...
माझ्या मनाला जपेन मनाच पण थोडे ऐकेन ...
स्वतःची आवड जपेन स्वतः साठी वेळ देईन ..
कधी कधी आपण आयुष्यात एवढे व्यस्त होतो कि स्वतःची ओळख विसरून जातो ...
बघूया संकल्पच्या निमित्ताने का होईना मी स्वतःला नव्याने परत ओळखु लागले तर ...
