नवी पहाट
नवी पहाट
1 min
297
नवी पहाट घेऊन आली
चैतन्याचा घाट
गंध फुलांचा असा खुलला
पहाटेच्या रंगात रंगून गेला
नव्या दिवसाची सुरुवात आहे
वाट हिरवळीने सजली आहे
झेप घेऊन गगनी
पक्षी उडत जाई
पहाटेची गाणी गातच राही
पाना पानावर दवबिंदुंचा
असा काही थाट आहे
ओघळून ते दवबिंदू
धरतीला भिजवत आहे
मोहक मोगरा असा उभा आहे
फुलांची बरसात करतच आहे
ताला सुरात वेली डोलत आहे
मन मोहरून घेत आहेत
नवा ध्यास नवी आस
घेऊन आली नवी पहाट
