STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

3  

Rohit Khamkar

Others

नवदुर्गा

नवदुर्गा

1 min
304

परत तूझ्या बद्दल लिहतो, बाकी राहिलेलं थोडसं मांडतो.

मनातल्या शब्दांचा सडा, कागदाच्या अंगणावर असा काही सांडतो.


तु आलीस आयुष्यात, तीच खरी पहाट झाली.

नव्या सुरवातीची आणी सगळं बदलण्याची, वेळच आली.


मला वाटलं तु एक रूपात, आणी एकाच नात्यात आली.

हळूहळू पैलू खूलू लागले, बाकी नात्यांच्या शब्दांनाही जाग झाली.


नात मुलगी बहिण, एवढं सांभाळत होतीस.

हे सांभाळत सून वाहिनी आणी बायको, म्हणून आलीस.


एवढं सगळं सांभाळून, आई पण झालीस.

देवीआईच्या रूपासारखी, नऊ रूपात पावलीस.


तुला पाहिलं की कळतं, अवघड सगळं सोपं आहे.

सगळ्यांसाठी झटताना, नवदुर्गा मी तूझ्यात पाहे.


Rate this content
Log in