नवचैतन्याची बहार
नवचैतन्याची बहार
1 min
268
उन्हात तळपली धरित्री
जीवांची झाली लाहिलाहि
सोसवेना हा चटका
वाफाळल्या दिशा दाही.
तप्त झालेल्या धरित्रीवर
पर्जन्याचा वर्षाव व्हावा
हरएक त्या थेंबाने
मोहक म्रुदगंध सुटावा
सुटावा थंडगार वारा
पर्जन्य बरसावा गारांच्या सवेत
यावे उधान आनंदाला
घ्यावे ओंजळ भरून कवेत
मातीच्या या ओलाव्यात
सुवासिक मोगरा फुलावा
टपोऱ्या थेंबाचा स्पर्श
कणाकणांना व्हावा
अन् जगण्याला यावा बहर नवा.
