STORYMIRROR

Dinesh Kamble

Others

3  

Dinesh Kamble

Others

नवा करार

नवा करार

1 min
11.4K

तुझे प्रेमगीत गाण्यासाठी 

शब्द कसे मी गुंफण करावे 

कसा आळवू मी मिलनाचा सुर 

वाटे भावनांना मी कुंपण करावे 


आता सरला वसंत तुझ्याविना 

नाही झाली भेट आपुली

अजूनही आहे आस या वेड्या मनाला 

घडेल कधीतरी समेट आपुली  


जेंव्हा नियती देईल संधी 

पुन्हा आपल्याला एकत्र येण्याची

मी विसरेल सारा गतकाळ माझा 

तू ही सैल सोडावी अढी मनाचीं 


त्या जुन्यापुराण्या जखमांची पुन्हा

नको कधीच ती काढणे खपली 

नको विखारी शब्द वापरूनी पुन्हा 

नको रे वाढवू नात्यातली दरी आपली


चल आता नव्याने पुन्हा 

एक नवा करार करूया 

या पावसाळ्यात एक होऊया 

गळ्याभोवती करकमलांचे हार करूया 



Rate this content
Log in