नव वर्ष स्वागत
नव वर्ष स्वागत
हे नूतन वर्षा दोन हजार एकवीस
आजचा दिन जसा काही नवा नवा
नव्या वर्षाचे स्वागत करण्या हो
श्वास मोकळा घेण्या हवा हवा....
सूर्याची लाली, किरणे नवी नवी
कोरोनाचा संपू दे देवा आता कहर
नव्या संकल्पांचा, नव्या आशेचा
उमलू देत नाविन्याचा छान बहर...
प्रत्येकाच्या ओठावर माणूसकिचे
गीत ऐकायला मिळू नवीन वर्षा
दाही दिशांमधे समानतेचे वारे
पाहूनच होवू दे रे या मना हर्षा...
खूप काही नको बाबा खरतरं
सुखाची परिभाषा बदलूया खरी
अंगभर वस्त्र,राहायला निवारा
खायला पोटभर अन्न मिळो सर्वांपरी...
स्वपरीक्षण करण्यासाठी खरचच
स्वच्छ सुंदर मनाचा आरसा हवा
निर्मळ अंतरहवे,चारित्र्य पण हवे
मोकळा श्वास आसमंतात घेवू नवा...
नूतन वर्षाचे अभिनंदन, स्वागत करते
बदल आपल्या आचरणातच करू या
सार्यांना समजून घेता घेता आपणच
मोठेपणाने चुकलेल्यांना माफी देवू या...
नवीन वर्षाचे नवे वारे अनुभवू या
सर्व मानवतेशी चांगलेच हो वागू या
नको हेवे दावे नको दुस्वास कोणाचा
सर्वांशीच नरमाईने वागण्याचा प्रयत्न करू या...
