STORYMIRROR

yuvaraj jagtap

Others

4  

yuvaraj jagtap

Others

नव वर्ष नव संकल्प(किरणप्रभा)

नव वर्ष नव संकल्प(किरणप्रभा)

1 min
728


नव वर्ष नव संकल्प(किरणप्रभा)


नवे संकल्प नवे विचार मनी पेरू

दुःखे जाळून सारी सुखाचा हात धरू ।।धृ ।।


वाईट विचारावर सोडूनिया पाणी

सदविचाराची आनंदाने गाऊ गाणी

अंतरीची घाण काढूनिया दूर करू।।१।।


जुने अनुभव जमेस घेऊनि पाठी

यशासाठी प्रयत्नांच्या मारूयात गाठी

कलंक अपयशाचा बाजूला हा सारू ।।२।।


आनंदाचा जीवनात शिंपूनीया सडा

निराशा दूर लोटू आशेचा भरू घडा

नव तेजाचा सुसाट सोडूया रे वारु ।।३।।



Rate this content
Log in