STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

नूतनवर्षाभिनंदन

नूतनवर्षाभिनंदन

1 min
184

नवीन वर्षी मुखकमलावर

सदैव ठेवूया आपण आनंद

नवीन संकल्प केली तरी

करून दाखवूया ते सिद्ध....


नव्या किरणांची नवी छटा

नवी पहाट पाहा सजली

सूर्यनारायणासह वसुंधराही

आज या समयी भुलली....


जपू या मने एकमेकांची

सर्वांनाच देवूनी मान

ठेवू सतत आपण सारे 

वास्तवतेचे परिपूर्ण भान.....


नील गगनी विहग उडती

नव चैतन्याचे घेवूनी वारे

मनात काय बरे असेल यांच्या?

सदैव वाहते वारे यांचे न्यारे....


अन्यायाला देवूनी आहुती

चांगल्या गोष्टींचे करू या जतन

गतकालीन वर्ष सरले आता

स्वतःच्याच आचारांचे करू या मनन.....


मन ठेवू निर्मळ अन पवित्र

ना कोणाशी वाद घालू या

नको कुणा दुःख देवू या

सदैव आपण सुसंवाद साधू या.....


विद्यार्थ्यांनाच आपले दैवत मानुनी

उत्तम मूल्यसंस्कार त्यावर कर या

ज्ञानाचे दीप सतत तेवत ठेवू या

चैतन्यमयी वातावरणात त्यांना खुलवू या.....


Rate this content
Log in