नूतन वर्षाभिनंदन
नूतन वर्षाभिनंदन
1 min
698
सरता सरता सरले मागचे वर्ष
देऊनि थोडे गम, आणि हर्ष
नव्या वर्षाची नवी पहाट
नवे स्वप्न, नवी वाट
आनंदाच्या क्षितिजावर नवा सूर्योदय
वेगळ्या आव्हानांना, आता नाही भय
करूया या वर्षाचे सुंदर संकल्प
असो आनंद जास्त, राहो दुःख अल्प
सगळ्यांच्या साथीने उभे राहूया
एक नवीन विचार प्रवाहात आणूया
झटकून निराशा, जागवूया आशा
साथ दे आम्हा, हे प्रकाशा
तुम्हा सर्वाना माझ्यातर्फे नूतन वर्षाभिनंदन
आयुष्याच्या अध्यायाला, हार्दिक अभिनंदन
