नूतन वर्ष
नूतन वर्ष
1 min
328
नूतन वर्षी नभांगणात उघड्या
निशा नटून आली
झाडे वेली महाल सजले
तरुणाई धुंद बुडाली.......
समयालाही लाली चढली
वाढले क्षणांचे मोल
वर्षभराचे हिशोब मांडले
बडवीत नगाडे ढोल........
किती भारुडे रात्री रंगली
नर्तक बनले अबोल
न कळतच जाईही फुलली
गाऊ लागली गोड.........
अनेकांनी संकल्प सोडले
कुणी लावली होड
रिचवीत प्याले ग्लास फोडला
बाराचा वाजला टोल........
