नशीबाचं ओझं
नशीबाचं ओझं
1 min
147
इवलिशी ती गोड पोर
कर्तुतवानं होती थोर.
आई जागीच पडली असता
घराचा पडे तिलाच घोर.
घराचं भार स्वतःवर घेऊन
संसाराच्या जोताला स्वतःलाच जूपलं.
लहान भावाची आई होऊन
बालपणच बिचारीचं होतं संपलं.
घरचा पसारा आवरता आवरता
बाहेरची धूनी भांडीही तिने केली.
लहान भावाच्या संगोपनासाठी
स्वतःची शाळा देखील सोडून दिली.
नशीबाच्या या खेळा मुळे
लहान माथी मोठ ओझं
न डगमगता हाकला गाडा
वरून प्रफुल्लित पण मन मात्र झिजं
इवल्या त्या छोट्या पोरीने
होत कसं सारं करावं सहन
जीवनाची कोरी पाटी लिहिण्या आधी
आयुष्याचं नशीबानं केलं होतं दहन..
