STORYMIRROR

Chandanlal Bisen

Others

3  

Chandanlal Bisen

Others

नशीबाचे भोग

नशीबाचे भोग

1 min
201

या जीवन सागरी

जीवन व्यतित करताना

दुःखाच्या लहरी उसळती

उसळत्या लहरीत सुख

क्षणार्धात विरून जाती...!


कुणास ठाऊक दुःख का येतं?

कशामुळे अन् कोण जबाबदार असतं?

कितीही प्रयत्ने, सुखी राहण्याचा

दुःखासुर दारी दस्तक देतं...!


एका मागोमाग विजा कडाडती

मनोधैर्य तोडूनी चूर-चूर करती

सुखी संसार धडाधड मोडती

कष्टे, खस्ता सोसण्या लागती...!


अनेक संकटे उभी दारात

जशी संकटाची नियोजित खैरात

कधीकाळी धनदौलत, शोहरत

वर्तमानकाळी जाई विरत...!


प्रश्न पडे बुद्धीमंता की,

हे काय विश्वमर्यादा रहस्य असतं?

...तर पूर्व जीवनातील जशी कर्मे

त्यान्वये नशिबी भोग असतं...!!!


Rate this content
Log in