STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Others

3  

🤩ऋचा lyrics

Others

नशीब !!

नशीब !!

1 min
253

तिने बालवयापासूनच कष्ट केले

हलख्यात दिवस काढले

कोवळ्या वयात तिच्यावरचे

आईचे छत्र हरपले


लहानग्या वयात तिच्या अंगावर

अनेक जबाबदाऱ्या पडल्या

फेकून दिल्या तिने कपटातल्या

तिच्या साऱ्याच बाहुल्या


मौज मस्तीला केला रामराम

सोडलं काही गोष्टीचं सुख

आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी

विसरली ती स्वतःची तहान भूक


वाचली तिने असंख्य पुस्तकं

नव्या गोष्टीही आत्मसात केल्या

उदंड कष्ट घेतले तिने,अन ,

आज नावासमोर अनेक डिग्र्या लागल्या


लोक म्हणतात तिला,-बाळा 

परमेश्वर इतका क्रूर नाही

त्याने तुझी आई नेली

म्हणूनच आज तुला बाळा

नशिबानेच सारी साथ दिली...


Rate this content
Log in