नशीब
नशीब
आई अन बाबांची
लेक अती लाडाची
लेक मोठी हो झाली
वार्ता ही आनंदाची
नवरा गुणी मुलगा
पाहायला आला
मला पाहाताच
हर्षाने नाचला
विचारात त्याच्या
आकंठ मी बुडाले
स्वप्नात त्याच्याच
सदा मी हरवले
लग्न छान लागले
संसारी पण रमले
संसार वेलीवर
तीन गोंडस मुले
एक दिवशी बाई
एक वार्ता समजली
पायाखालची जमीन
सर्रकन सरकली
ब्रेन ट्युमर झाला
माझ्या सजणाला
हा आजार का बर
आला माझ्या वाटेला
फक्त हेच नाही हं
हार्टॲटॅक आले
लंगचेही ऑपरेशन
त्याच वर्षी झाले
नयनांचे लेसर
ऑपरेशन झाले
मेंदूचेही ऑपरेशन
बाई बाई ग झाले
नशिबाचा खेळ
सुरुच राहिला
सजना अजूनही
आजारात दमला
पण एकच आहे
फिरतो सारीकडे
घराच्याच जवळच
लक्ष देतो कुटुंबाकडे
असा माझा सजना
सर्वांग वेगळा आहे
तरी वसुधा त्यावरी
अपार प्रेम करू पाहे
