नराधमांनी पोलिसांवर
नराधमांनी पोलिसांवर
1 min
228
नराधमांनी पोलिसांवर
उचलले जेव्हा शस्त्र
पोलिसांना काढावे लागले
अखेर बाहेर ब्रह्मास्त्र
जिथे निरपराध युवतीला
जाळले रात्रीच्या वेळी
तिथेच झाली त्यांच्याही
रक्ताची शेवटी होळी
कोट्यवधी मायभगिनी
आज आनंदाने नाचल्या
भविष्यातल्या अनेक 'निर्भया'
संकटातून वाचल्या
नराधमांना गोळ्या घालून
थेट पाठवून ढगात
मान उंचावली पोलिसांनी
भारताची सर्व जगात
तिरक्या नजरेचे विकृत
येतील आता काबूत
सन्मान राखा बहिणीचा
नाहीतर नेस्तनाबूत!
