नॉट रिचेबल आठवण ....
नॉट रिचेबल आठवण ....
डायरी लिहिताना आली आठवण तुझी ...
भरभर मी लिहित गेले तुझ्यावर चार ओळी...
आठवले ते क्षण जेव्हा असायचा तू समोर ...
मस्त हसत जगायचा तू मित्राबरोबर...
आठवणीने तुझ्या डोळे माझे पाणावले ....
डायरी चे पान ही अश्रू नि भिजले ....
मधेच डोक्यात विचार आला पटकन ..
येत असेल का तुला माझी आठवण
कि फक्त माझ्या मनात आहे तुझी साठवण ...
मन माझे म्हणू लागले त्यावर ...
येत असेल तुझी त्याला आठवण असेल
त्याच्या मनात तुझ्याबद्दल खास साठवण ...
लगेच मी फोन उचला आणि शोधला त्याच्या नंबर ....
रिंग गेली ती पण पटकन
मी म्हणाले हॅलो ....
पलीकडून आवाज आला हॅलो कशी आहेस डिअर ....
माझे मन गुंग होऊन नाचू लागले त्यावर .....
पलीकडून परत आवाज आला हॅलो
भानावर येऊन मी म्हणायच्या आधी हॅलो ..
फोनाचा गेला नेटवर्क ...
नेटवर्क येताच लगेच लावला फोन त्याला परत....
पण त्याचा फोन मिळाला नोट रिचेबल .....
