नोकरी
नोकरी
1 min
337
क्रूपा सरस्वतीचिं
शिकतेय आजवर
क्षेत्र ना कोणते असे
अभ्यासलें ना त्यावर
क्रूपा द्रुष्टी लक्ष्मीचिं
जाहली सत्वर मजवर
होताच शिक्षण पूर्ण
नोकरीसाठी होते तत्पर
वेतन जरी थोडे
समाधान अपार
वडिलांच्या कष्टाला
तेव्हडाच हाथभार
क्षेत्र नव्हते मिळतेजुळते
नवती खंत कधीही
लाभली साथ सगळ्याचिं
कष्टाने साध्य काहीही
नोकरी शिक्षिकेचिं
केली काही वर्ष
ध्येय होते सामान्य
होतो त्याने हर्ष
फक्त एकच सल मोठे
राहते सदा मज मनी
कामाच्या ठिकाणी सलगी
देते अश्रू सदैव नयनी
चूक जाहली चुकून तेव्हा
भाळलें खोट्या मुखवट्याना
ईर्षा बाळगत होते मनी
फसवते माझ्या सारख्यांना
