STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

नणंद भावजय

नणंद भावजय

1 min
5.5K

नाते नणंद भावजयीचे

 नाव आणि बंधनाच्या पलीकडचे  

कधी प्रेमळ भांडण तर कधी रुसवा परंतु भरभरून प्रेम असणारे  

भावनांच्या सुईने प्रेमाच्या धाग्याने असते हे विणलेले


 नाते नणंद भावजयीचे 

हसुनी विसराव, विसरुनी हसाव 

शब्दाची नाजूक फुंकर घालणारे 

नात्यातल्या प्रत्येक जबाबदारीला असते तळहातावर पेलणारे 


नाते नणंद भावजयीचे  

नव्या पालवी प्रमाणे सतत फुलणारे गरज असते तेव्हा असते चंदनाप्रमाणे झिजणारे

अन् कस्तुरी बनून सर्व घरात असते दरवळत राहणारे


नाते नणंद भावजयीचे  

एकमेकांना समजून घेत आपलेपण जपणारे

 ओघळलेच अश्रू तर असते ते अलगद टिपणारे  


नाते नणंद भावजयीचे 

 खळखळून हसणे,लगेच रुसणे 

कितीतरी हर्षाचे हिंदोळे मनात बांधतांना

मन मोकळे कराया मात्र एकमेकींच्या मनाचे कोपरे असते शोधणारे


 नाते नणंद भावजयीचे 

प्रेमाचे ,आपुलकीचे, जिव्हाळ्याचे 

हे बंध रेशमाचे, स्नेहाच्या धाग्यात असते हे गुंफलेले ..


Rate this content
Log in