नमस्काराचे महत्त्व
नमस्काराचे महत्त्व
माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. एकमेकांबरोबर प्रेमााने वागले पाहिजे, अडीअडचणीत एकमेकांना मदत केली पाहिजे, सुख-दु:खात एकमेकांना साथ दिली पाहिजे, परस्परांशी संंबंध सुधारले पाहिजे. दररोज एकमेकांशी आनंंदाने वागले पाहिजे. वडीलधाऱ्या माणसांना आदराने बोलले पाहिजे. एकमेकांना मोठेपण दिला पाहिजे.
म्हणूनच नमस्कारात प्रेम आहे, नमस्कारात विनय आहे, अनुशासन आहे. नमस्कार आदर शिकवतो, नमस्कारामुळे मनात सुविचार येतात. एकमेकांना नमस्कार केला की आपल्या मनातला क्रोध, राग नष्ट होतो. नमस्कारामुुळे अहंकार नष्ट होतो. नमस्कारात शीतलता आहे. नमस्कार हा एकमेकांचे अश्रू
पुसण्याचे काम करतो. नमस्कार हा आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचं आपण जतन केले पाहिजे.
आजकाल
काही लोक असे आहेत की त्यांना नमस्कार केला की ते पाहून न पाहील्यासारखे करतात आणि पाहीलेेच तर फक्त थोडीशी मान झुुकवतात. अशा माणसांना नमस्काराचेे महत्त्व माहीतच नसतात. कारण त्यांच्यात माणुसकी नसते. ते चुकून माणसांंच्या जन्माला आलेेत.
