नमो बुद्धाय
नमो बुद्धाय
1 min
12.2K
अवतरले पृथ्वीवरती
तेजस्वी बाळ सिद्धार्थ
जगी देण्यास
शांती-अहिंसेचा विश्वास
संसार-ऐश्वर्याचा
त्याग करुनि
वृक्षाखाली बसले निवांत
आजही आहे कायम
बुध्द साऱ्या जगाच्या हृदयात
बोधी वृक्षातळी
मिळवले ज्ञान अगाध
झाले सिद्धार्थाचे गौतम बुद्ध
वाटले ज्ञान साऱ्या दुनियेस
शांततेचा समानतेचा
दिला त्यांनी संदेश
आजही चालती
त्या मार्गावरती बुद्धवादी
मानूनी तो आदेश
