नकळत भिजले नयन...
नकळत भिजले नयन...


असता नदी किनारी मी
वाहत होता तो शांत पवन
आठवणीने व्याकुळ जीव
माझे नकळत भिजले नयन...
शांत वाहणार्या बघून नीराला
आठवले आईच्या कुशीतले बालपण
स्पर्शाने अलगद वार्याच्या त्या
माझे नकळत भिजले नयन...
पसरलेल्या सुगंधाने वार्याच्या
आठवले शेणामातीने लिंपलेले अंगण
आले हुंदके हृदयातून अचानक
माझे नकळत भिजले नयन...
होती कडा नयनांची ओली
एकटाच मी जरी भोवती असता सारेजण
झाले अश्रू मग अनावर तेंव्हा
माझे नकळत भिजले नयन...
आठवतात क्षणोक्षणी मला
घालवलेले आईच्या सहवासातले क्षण
आज परत एकदा आठवता आई
माझे नकळत भिजले नयन...