नकारघंटा....?
नकारघंटा....?
मी हे करणार नाही
मी ते करणार नाही
यालाच
नकाघंटा म्हणतात.....
अशीच
नकारात्मकता घेऊन
बहुसंख्य
सार जीवन
कुढतच व्यतिथ करतात....
विज्ञान विज्ञान
म्हणतच
ज्ञानीपण नकारघंटायुक्त
अज्ञानाचा झेंडा मिरवतात.....
जणू
प्रकाशालाच ते
नितदिन
अंतरातून घाबरतात....
डर के आगे जीत
हे कधी कधी
ते नकारात्मकतेने
डोळसपणे विसरतात....
म्हणून तर
दोरीलाही
अंधत्वाने
साप साप म्हणून बडवतात....
दिवे लागण
अशा
नकारात्मक
अंतरात होऊ दे....
सारी नकारात्मकताच
आजच्या
दिवे लागणीने
जळून खाक होऊ दे....
प्रत्येक
दिव्याच्या तेजात
नवचैतन्य
फुलून येऊ दे....
चैतन्यमयी
उत्साही आरोग्य संपन्न
जीवन सर्वांनाच
हे ईश्वरा लाभू दे.....!
