नका अडवू माझी वाट
नका अडवू माझी वाट
नका अडवू माझी वाट
तुमचा बघून घेईल थाट
एक दिवस सगळ्या समोर
उघडकीस येईल थरथराट..…..!
तु करु नकोस बोभाटा
तु मनात ठेऊ नकोस संशयित पुरावा खोटा
नाहीतर उद्या तुझाच होईल तोटा.
म्हणून सांगत होतो गपगुमान रहा
आपल्यावरूनच जग पहा....….!
आपलीच जीभ आपल्याला भुवती
साऱ्या जनात आपलाच अपमान करती
बोलुन न बोलून पलटी मारती
आज न उद्या बोलती बंद होती
नको ते बोलायला भाग पाडती
आपलीच घर दार नातं तोडती
आपलीच परकी होऊन जाती.......!
नका अडवू माझी वाट
तुमचा बघून घेईल थाट
एक दिवस सगळ्या समोर
उघडकीस येईल थरथराट..…..!
प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ
तूंच जिव्हारी असली नियती दाखवून
देती प्रत्येक गोष्टीची आठवणी करून राहती.
डोळ्यासमोर शब्द नयनी अश्रु येती......!
