नजर ....!
नजर ....!
बाबांना कळायची
माझ्या देहबोलीची भाषा,,,,
थोडंस आईच्या अवतीभवती ,
घुटमळतांना दिसलं की ,
लगेच
हं , काय म्हणणं आहे बोला ...
ठीक आहे ,
त्याला म्हणा ....
जरा आतातरी मोठे व्हा ,
आणि
न बोलताचं मागणी पूर्ण व्हायची ....!
इतिहासजमा झालीय ही गोष्ट
माझ्या चेहऱ्यावरचे भाव
ओळखून घ्यायचेत पटकन .... !
आता चिरंजीवांना
घुटमळतांना बघतोय कधीकधी
अर्धांगिनी च्या अवतीभवती
आणि ओळखण्याचा प्रयत्न करतोय ,
पण
बाबांची ती नजर
नाही उतरलेली दिसत
माझ्या नजरेत की ,
माझ्या डोळ्यांची अनुभूती
कमी पडतेय की काय ... ?
काही कळत नाही ....!!!
