STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

नजर...!

नजर...!

1 min
180

नजर म्हणताच

नजर सर्रकन फिरते

आत आत 

खोलवर


अंतरात जाऊन भिडते

एक कटाक्ष

सर्व काही

सांगून जातो

किती तरी

भाव मनाचे उलगडतो

पण 


नजरेनेच खूप काही

प्रताप घडतात

इतिहास घडतात

इतिहास रचले जातात

नजर जितकी चांगली

तितकीच घातक


नजर म्हणजे दुधारी तलवार

जो नजरेने घायाळ झाला

तो कामातून गेला हे सत्य

नजर लागणे

नजर लावणे

नजर काढणे

किती तरी नजरेचे

नखरे आजवर पाहिले

पण


एक नजर

सर्वात चांगली

जी नम्रतेचा भाव जाणते

नम्रतेचा भाव जाते

आणि नम्रतेने सदा झुकते


आणि 

तीच खरी

सारे जिंकते

तिथेच सर्वस्व

समर्पण भावना

सदैव वसते

म्हणून अशी नजर

उरात घर करते

आणि


सदैव चिरंतन

चिरंजीव होऊन

जन्मभर

ठाण मांडून

अंतरात राहते....!


Rate this content
Log in