नजर जहरी
नजर जहरी
1 min
209
राहते अबोल जरी
नजर जाते खोलवरी
मनाच्या सागरी
उठतात प्रेम लहरी
खुळे माझे मन जरी
कधी वागे शहाण्यापरी
होता नजरानजरी
बाधा होई त्यास जहरी
रित अशी प्रेमाची
मन होई अविचारी
फुलाच्या सभोवारी
कैक भ्रमरे बिचारी
येता सारे भानावरी
गोष्ट मना उमजे खरी
वेळ निसटली वाळूपरी
नजर लागली जिव्हारी
