नियती
नियती
1 min
533
सुरवात आणि शेवट नसे जरी आपल्या हाती
यामधील प्रवास मात्र ठरवते ज्याची त्याची नियती
कुणाच्या वाट्याला आनंद आला तर कुणी ठरले कमनशिबी
या खडतर काळात मात्र नसे कुणी सोबती।।
कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी आली त्या कोवळ्या हाती
ज्या वयाने दंगमसती करावी,त्याने घेतली कष्टाची ढाल हाती
जन्मभर आई बापाला कष्ट करताना पाहिलं
आई बापाच्या आदर्शावर चालण्याधीच नियतीने त्यांना घेरलं हरवलं छत्र मायेचं कठोर झाली नियती
खडतर या प्रवासात नसे कुणी सोबती।।
या अदभुत धक्क्याने सावरण्याची संधीही नाही दिली
जबाबदारीच्या ओझ्यात निरागसता मात्र हरवली
लहानग्या त्या वयात कष्टाची सुरवात झाली
भावंडांच्या पोषणासाठी दिली शिक्षणास आहुती
खडतर या प्रवासात नसे कुणी सोबती।।
