नियमभंग
नियमभंग
तोड्तो नियम आम्ही, अभिमान याचा खूप.
तेल खाणारे हात, बोटाला दाखवतात तूप.
बोंबला समाजाच्या नावे, त्यांची आहे ती चूक.
स्वतः कामासाठी केलाभंग, घाई होती चिडिचुप.
गर्दीतली गर्दी मोजताना, स्वत:ला विसरून जातो.
स्वताला एकेरी पारड्यात ठेऊन, समाजाला पाहतो.
काम झाल की, चुकाही विसरतो.
पुन्हापुन्हा तीच चूक करण्या, जिव हा सरसावतो.
बढाई बाता, थोरामोठ्याच्या चुका काढतो.
ऊभा रहायचा प्रश्न असेल, तेव्हाच पळतो.
अर्धवट ज्ञानावर, फसवी हुशारी पाजळतो.
कलयूगात जगताना, अक्कल सुध्दा विकत घेतो.
वेळीच सावरा, अथवा मूल्य मोजावे लागेल.
भरून निघणार नाही, नंतर कितीही चांगल वागेल.
