STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

निवांत...!

निवांत...!

1 min
188

निवांत...!


निवांत बसलो होतो

झाडा खाली मी एकटाच

तितक्यात डोळा लागता

रमलो मी माझ्याच स्वप्नात...


भल्या मोठ्या अवकाशात पाहता

पोकळी मज भासली विराट

मनही बागडू लागले

होउनी आनंदाने सैराट...


एक परी अलगद आली

पुसण्या मज हितगुज

लेऊनी पंखांचे आंदण

देखणे खरोखर नाजूक...


सौन्दर्याची खाण ती

पाहून झालो मी थक्क

हृदय माझे करू लागले

प्रेमाने धक धक धक्क...


हसली नाजूक साजूक

हिरावले माझे मन

आत्मा माझा धावला

सोडुनी क्षणात माझे तन...


हरलो मी जिंकली ती

जडली वेडी प्रीत

हीच वाटते असावी

प्रेमाची नवी रीत....!



Rate this content
Log in