निवांत
निवांत


थोडासा वेळ हवाय, फक्त आणी फक्त स्वतःसाठी.
कधी तरी वाटतं, एवढी ती धावपळ कश्यासाठी.
थोड्याश्या गप्पा थोडी शांतता, थोडा एकांत आणी आराम.
या सगळ्यासाठी करावा, दगदगीच्या वेळेला रामराम.
खुप लांब जाव, या सगळ्या व्यापातून.
फक्त थोडासा वेळ हवाय, आयुष्याच्या मापातून.
सतत तान तनाव, पळतोय घड्याळ्याच्या काट्यासोबत.
बालपणीचा रस्ता चुकलोय, जगण्याच्या या वाट्यासोबत.
खुप काही मिळवताना, खुप काही सुटतय.
धावणाऱ्या मनासोबत, मन नेमकं तेच पाहतय.
पाहायचय आता सगळं, थोडा वेळ निवांत थांबून.
धावणाऱ्या वेळेला सांगा आता, ये मनाव्ह थोड माघूण.